नमस्कार ,
आज आपण पोस्ट ऑफीस च्या एका महत्वपूर्ण योजनेविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.


 काय आहे पोस्ट ऑफिस विमा योजना :
                पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ असा की, तुम्हाला वर्षभरात एकदाच 399 रुपये भरायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला वर्ष भरासाठी सुमारे 10 लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. एक वर्षानंतर पुढील वर्षासाठी योजना सुरू ठेवण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नूतनीकरण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षासाठी पघात विमा संरक्षण प्रदान करण्यात येईल.

महागड्या प्रीमियममध्ये विमा काढू न शकणार्‍या गरीब लोकांसाठी पोस्ट विभागाने सुरक्षा का पहला कदम नावाची विमा योजना आणली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा वर्षभरात फक्त  399 रुपयांच्या प्रीमियमसह 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल 

कसा कराल अर्ज..?

    पोस्ट ऑफिस 299 आणि 399 रुपयांचा विमा योजना लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक असणे आवश्यक आहे. ते नसल्यास तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधी काढून घ्यावे लागेल. यासाठी तुम्ही पोस्टमन आणि पोस्ट ऑफिसातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकतात. तसेच आपल्याला पोस्ट ऑफीस मध्ये जाने शक्य नसल्यास आणि आपले खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असल्यास आपल्या गावातील पोस्टमन ला आपण संपर्क केल्यास ते तुमच्या घरी किंवा ऑफीस च्या ठिकाणी येऊन आपला विमा  प्रस्ताव ओनलाईन सादर करू शकतात.
पोस्टमन ने विमा ऑनलाईन सादर करताना आपल्याला आपल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रु ३९९ असल्याची खात्री करावी . तसेच पोस्टमन ला कोणतीही अतिरिक्त रक्कम देण्याची गरज लागत नाही.

पॉलिसि कशी मिळते?

    ग्राहकाला पॉलिसि कागदपत्र (Documents) ची लिंक ७-८ दिवसात sms किंवा ईमेल वर येते. तिकडून तुम्ही PDF स्वरूपात पॉलिसि डाउनलोड करू शकतात. किंवा तिची प्रिंट देखील काढू शकतात पॉलिसि कशी मिळते

जाणुन घेऊयात योजनेचे फायदे
* इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा एआयजी यांच्यातील करारानुसार, 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना अपघात विमा संरक्षण मिळेल .
  * 399 रुपयांच्या प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा 10 लाख रुपयांचे कायमचे आंशिक अपंगत्व, आयपीडी वैद्यकीय दाव्यासाठी 60,000 रुपयांपर्यंत अपघाती इजा, 30,000 ओपीडी दावा, दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा समावेश आहे.

     १) विमाधारकाचा व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
     २) विमा धारकास कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
     ३) विमा योजना दवाखान्याचा खर्च करण्यासाठी 60 हजार रुपये प्रदान करण्यात येतात.
     ४) या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत विमाधारकाच्या किमान दोन या मुलांच्या                 शिक्षणासाठी 1 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
     ५)  विमाधारकास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असेल तर दाखल केलेल्या दररोज 1             हजार रुपये प्रति दिवस असे 10 दिवसांपर्यंत देण्यात येतात.
     ६) विमाधारकास OPD खर्च हा 30000 रुपये प्रदान करण्यात येतात.
     ७) विमाधारकास पॅरालिसीस झाल्यास त्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
     ८) विमाधारक व्यक्तीचा कुटुंबास दवाखानात प्रवासासाठी प्रवास खर्च म्हणून 25000 रुपये प्रदान         करण्यात येतात.

दहा दिवस रूग्णालयात दररोज हजार, कुटुंबाचा वाहतूक खर्च रु. 25,000 पर्यंत, अंत्यविधीचा खर्च रु. 5,000 पर्यंत. वरिष्ठ डाक विभाग हमीरपूर नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, 30 जूनपासून ही विमा योजना विभागाने सुरू केली आहे. 

What Is TAG? | TAG काय आहे ....?
            भारतीय डाक विभागीय अंतर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे एक डिजिटल बँक अकाउंट असून ह्या IPPB मध्ये आपले खाते असणे आवश्यक आहे. हा अपघाती विमा इंडियन पोस्ट पेमेंट बँक मार्फत हा अपघात विमा टाटा जनरल इन्शुरन्स या कंपनीचा आहे. या विम्याचे नाव टाटा ऍक्सिडेंटल गार्ड (TAG) असे आहे


आमच्या लेखावर काही प्रश्न किंवा दृष्टिकोन मिळाला? आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

मित्रनो आजची माहिती कशी वाटली या बद्दल नक्की कळवा , तसेच आशाच  नवीन योजने बद्दल  आम्हाला फोलो करा. ....................धन्यवाद