गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,
आज आपण पाहणार आहोत शेतकरी अपघात विमा योजना
योजने विषयी थोडक्यात माहिती :
शेती व्यवसाय करतांना शेतकऱ्यांना काही अपघात झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला विम्याचे संरक्षण देणे.राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावले आहे. अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.
(टीप-वेगवेगळ्या वर्षात वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबवली जाऊ शकते )
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी शासन निर्णय २७ एप्रिल २०२१
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत विहितधारक खातेदार शेतकरी व यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय ३१ ऑगस्ट २०२० घेण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थीस लाभास पात्र ठरणार नाही. असा निर्णय २७ एप्रिल २०२१ रोजी च्या बैठकीत घेण्यात आला.
शेतकरी अपघात विमा योजना पात्रता
१.मुख्य व्यवसाय हा शेती असावा.
२.स्वत: ची शेतजमीन असावी.
३.वय हे १० ते ७५ दरम्यान असावे.
२.स्वत: ची शेतजमीन असावी.
३.वय हे १० ते ७५ दरम्यान असावे.
४. कृषी अधिकारी यांच्या मार्फत सांगितलेले इतर कागदपत्रे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
१. एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाल्यास रुपये २ लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.
२. शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अपघातामुळे १ डोळा व १ अवयव निकामी झाल्यास रुपये १ लाख नुकसान भरपाई देण्यात येते.
३. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते.
४. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
५. शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून २ लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
६. शेतीची कामे करताना शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून १ लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
या कालावधीसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येईल. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी 10 ते 75 या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.
१.७/१२
२.उतारावयाचा दाखला
३.प्रथम माहिती अहवाल
४.मृत्यू दाखला\
५.घटनास्थळ पंचनामा
६.विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचीवरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/ विंचूदंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
लाभ कधी मिळणार नाही ?नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा इथे करा अर्ज
संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय. मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे. फो.नं. 020/26121041 शासनस्तरावरील संपर्क - अवर सचिव (11-अे), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-3
आमच्या लेखावर काही प्रश्न किंवा दृष्टिकोन मिळाला? आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
मित्रनो आजची माहिती कशी वाटली या बद्दल नक्की कळवा , तसेच आशाच नवीन योजने बद्दल आम्हाला फोलो करा. ....................धन्यवाद
0 Comments