नमस्कार ,
एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
प्रकार-२ चे लाभार्थी
एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या “सुकन्या' योजनेचे लाभ कायम ठेऊन खालीलप्रमाणे अधिक लाभ देण्यात येतील.
योजनेची उद्दिष्टे
2) बालिकेचा जन्मदर वाढविणे
3)मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
4)बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे
5)मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
6)सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील 7)कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे.
8)जिल्हा, तालुका, व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे
लाभाचे स्वरूप
महत्वाचा टप्पा | हेतू | अट | फायदे | |||
---|---|---|---|---|---|---|
प्रकार-१ चे लाभार्थी | प्रकार-२ चे लाभार्थी | |||||
पहिली मुलगी | दुसरी मुलगी | |||||
जन्माच्या वेळी | मुलींचा जन्म साजरा करण्याकरिता | जन्मनोंदणी आवश्यक | रु. ५,००० | निरंक | रु. २,५००/- | |
१. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे रु.१.०० लाख अपघात विमा व रु.५,०००/- पर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल. २. मुलीच्या नावावर शासनामार्फत एल.आय.सी. कडे रु.२१,२००/- चा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रु.१.०० लाख विम्याची रक्कम देण्यात येईल. ३. आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणा-या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नांवे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus Rs.२१,२००/-) नाममात्र रुपये १००/- प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल. ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील. अ) नैसर्गिक मृत्यू-३०,०००/- आ) अपघातामुळे मृत्यू-७५,०००/- इ) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास -७५,०००/- ई) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास309, Goo/- उ) आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेतर्गत सदर मुलीला रुपये ६००/- इतकी शिष्यवृत्ती प्रती ६ महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल. | ||||||
मुलगी ५ वर्षे वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षांच्या शेवटी | दर्जेदार पोषण देण्यासाठी १ अंडे १ दिवस किवा दर दिवशी दूध २०० मि.लि. दिले जात असल्याची खात्री करणे. | मुलगी जन्मल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक | रु. २,००० प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.१०,०००/-५ वर्षाकरीता | दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.१,०००/- प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.१०,०००/- ५ वर्षाकरीता | ||
प्राथमिक शाळा प्रवेश (इ.१ ली ते ५ वी) | गुणवत्तापुर्वक पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चाकरिता | मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक | रु. २,५००/- प्रतीवर्षीप्रमाणे एकूण १२,५००/- ५ वर्षाकरिता प्रतीवर्षीप्रमाणे | दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.१,५००/- प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.१५,०००/- ५ वर्षाकरीता | ||
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इ.६ वी ते १२ वी | गुणवत्तापुर्वक पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चाकरिता | मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक | रु.३,०००/- दरवर्षीप्रमाणे प्रतीवर्षीप्रमाणे एकूण रु.२१,०००/- | दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.२,०००/- प्रतीवर्षीप्रमाणे ७ वर्षाकरिता | ||
वयाच्या १८ वर्षी | कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी | वयाची १८ वर्षे पुर्ण व अविवाहीत असलेबाबतचे पालकांचे शपथपत्र | व्या विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रु.१.०० लाख देण्यात येतील. त्यापैकी किमान रु.१०,०००/-मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक राहील. | |||
मुलीचा जन्म झाल्यानंतर | आजी आजीबाला प्रोत्साहनपर भेट | पहिल्या मुली नंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक | सोन्याचे नाणे (रु. ५,०००/- कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र) | लागू नाही | ||
गावाचा गौरव | मुलामुलींचे विषम असलेले लिंग गुणोत्तर १,००० पेक्षा जास्त असण्यासाठी प्रोत्साहनपर | जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचे प्रमाणपत्र तसेच सदरची रक्कम गावातील मुलीच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक राहील | ग्रामपंचायतीस रु.५,००,०००/- इतके पारितोषिक मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. |
योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती
“सुकन्या' योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेत करण्यात आल्यामुळे 'सुकन्या' योजनेच्या सर्व अटी व शतीं'माझी कन्या भाग्यश्री' योजनेमध्ये लागू करण्यात येत आहे. तसेच ‘सुकन्या' योजनेतील मुलींना ‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
- सदर योजना सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावरील (APL) (पांढरे रेशनकार्डधारक) कुटुंबात जन्मणाच्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
- सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील. तसेच तिने इयत्ता १० वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील.
- दुस-या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली प्रकार-२ प्रमाणे योजनेस पात्र असतील.
- एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष (६ किंवा ६ वर्षांपेक्षा कमी) इतके असावे.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील.
- प्रकार-१ च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार-२ च्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- सदर योजनेअंतर्गत १८ वर्षांनंतर एल.आय.सी. कडून जे रु.१,००,०००/- मिळणार आहेत त्यापैकी किमान रु.१०,०००/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरुन संबंधित मुलीला रोजगार मिळून कायमस्वरुपी उत्पन्न मिळेल.
- सदर योजनेच्या टप्पा-२,टप्पा-३ व टप्पा-४मध्ये नमूद केलेले लाभ लाभार्थीस पोषण आहार तथा वस्तु स्वरुपात देय राहतील.
- ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील.
- सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.
- विहित मुदतीपूर्वी (वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नांवे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाचे नांवे असणा-या Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा म्हणून दर्शविली जाईल.
- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) महाराष्ट्र शासनाच्या नांवे एक नवीन पॉलिसी काढतील, ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते असणार असून, Surplus खाते खालील परिस्थितीत कार्यरत करण्यात येईल.
- जर वैयक्तिक मुलीच्या नांवे असलेल्या एकत्रित निधी (Corpus) रु.१ लक्ष पेक्षा अधिक झाल्यास, जादाची रक्कम या खात्यात जमा होईल.
- मुदतीपूर्वी विवाह अथवा मृत्यू झाल्यास, मुलीच्या नावांवरील रक्कम एकत्रित निधी (Corpus) Surplus g|(RTICIV जमा होईल.
- Corpus रु.१ लक्ष पेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम Surplus खात्यातून जमा केली जाईल.
- सदर योजनेच्या स्वरुपामध्ये परिच्छेद २ मध्ये नमूद टप्प्यातील लाभ जर लाभाथ्र्यास इतर विभागाच्या योजनेमधून मिळत असतील तर या योजनेचे लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
- सदर योजनेअंतर्गत परिच्छेद क्रमांक २ मधील टप्पा-१ मधील जन्मदिन साजरा करण्यासाठी लाभार्थी कुटुंबास रोख स्वरुपात देण्यात येतील. तसेच उर्वरीत टप्प्यातील नमूद लाभ पोषण आहार तथा वस्तूच्या स्वरुपात देण्यात येतील.
आमच्या लेखावर काही प्रश्न किंवा दृष्टिकोन मिळाला? आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
मित्रनो आजची माहिती कशी वाटली या बद्दल नक्की कळवा , तसेच आशाच नवीन योजने बद्दल आम्हाला फोलो करा. ....................धन्यवाद
0 Comments