पीम - किसान योजने विषयी थोडक्यात माहिती
वर्ष 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना सुरु केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यात ही रक्कम वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात आले आहे
इथे क्लिक करून पहा आपल्या गावची पीम - किसान
इथे क्लिक करून पहा आपल्या गावची पीम - किसान
(PM-KISAN) लाभार्त्याची यादी.
सर्व प्रथम खाली देलेल्या लिंक वर क्लिक करा
https://pmkisan.gov.in/
यादी पाहण्यासाठी खलील लिंक ला क्लिक करा
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
आशा प्रकारे आपण आपले राज्य ,जिल्हा ,तालुका,आणि गाव निवडा त्या नंतर Get Report वर क्लिक करा आणि आपल्या आपल्या गावची यादी पहा .
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपयांची मदत देण्यात येते. दर चार महिन्यांनी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 12वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये मिळाला होता. आता 13वा हप्ता जानेवारी महिन्यांत मिळण्याची चर्चा आहे.तर या वर्षाच्या अखेरपर्यंत ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
परंतु, या योजनेत एक अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, भुलेख पडताळणी अथवा केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांचा हप्ता थांबविण्यात येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
या योजनेत अनेक खोटे दावे होत असल्याचे समोर येत आहे. बोगस प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने योजनेत केवायसी अपडेट अनिवार्य केले आहे. योजनेतील बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि महाराष्ट्रात याविषयीचे प्रकार समोर आले आहेत.
हप्ता थांबविण्यात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना या योजनेतील पुढील हप्ता प्राप्त करण्यात कुठलीही अडचण येणार नाही.
तुमच्या खात्यात योजनेतंर्गत हप्ता जमा होणार की नाही, याचा पडताळा करता येतो. त्यासाठी तुम्हाला पीएम किसान या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल आणि यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासावे लागेल.
पात्रता, केवायसी आणि जमीन पडताळणी, या तीन पर्यायासमोर होय असे लिहिलेले असेल तर तुम्हाला योजनेतंर्गत 13 वा हप्ता वेळेवर मिळेल. जर यादीत एक जरी पर्याय तुमच्या विरुद्ध असेल तर मात्र तो तातडीने अद्ययावत करुन घ्या. नाहीतर हप्ता खात्यात जमा होणार नाही.
0 Comments