जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे
जॉब कार्ड म्हणजे काय? जॉब कार्ड हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) अंतर्गत बनवले जाणारे कार्ड आहे, जे ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. म्हणजे जे कोणतेही अकुशल श्रम करण्यास इच्छुक आहेत अशा लोकांना याच्या माध्यमातून रोजगार मिळतो

जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |
Documents For Job card in Marathi
मनरेगा जॉब कार्ड बनवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे देखील आवश्यक आहेत. जे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. आपण खालील सूचीमध्ये कागदपत्रांची यादी पाहू शकता –अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्डा
बँकेच्या पासबुक
मतदार ओळखपत्र
जॉब कार्ड कसे बनवायचे ?
जॉब कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवकाशी संपर्क साधावा लागेल. ग्रामसेवकाला तुमची सर्व कागदपत्रे – आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, विवाह नोंदणी आणि पती -पत्नीचा फोटो एकत्र द्या …ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतर, गावातील ग्रामसेवक, आवश्यक अधिकाऱ्यांसह या दस्तऐवजावर स्वाक्षरी आणि पडताळणी केल्यानंतर, मनरेगाच्या वेबसाइटवरील अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करतील.अर्ज केल्याच्या 30 दिवसानंतर, सरकारकडून त्याची पडताळणी केली जाईल, त्यानंतर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे ग्रामसेवकाकडे जॉब कार्ड तयार होईल.
खालील लिंक वर  क्लिक करून जॉब कार्ड लगेच पहा
https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?page=C&state_code=18


१) येथे तुम्हाला राज्याचे नाव निवडावे लागेल.
२) जिल्ह्याचे नाव निवडणे.
३) ब्लॉकमधील गावाचे/जिल्ह्याचे नाव निवडा.
४) पंचायतीमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव निवडावे लागेल
५) आणि शेवटी Proceed वर क्लिक करा.


जर तुम्हाला अजूनदेखील जॉब कार्ड बद्दल प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा..

धन्यवाद,